नाशिक, 28 एप्रिल : 'नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी समीर भुजबळ यांना विजयी करा,' असे मेसेज शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने नाशिकमध्ये फिरत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच नाशिकमध्ये युतीतील नेत्यांच्या नावाने राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मदत करण्याचे खोटे मेसेज प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहेत. BW-NASHIK हा अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहेत.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिकेची विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. तर सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours