परभणी- परभणी शहरासह जिल्हाभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परभणीत तापमान 45 अंशावर पोहोचले आहे. वाढते तापमान सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील बोदरगाव येथे घडली आहे. याठिकाणी शेती व्यवसाय करणाऱ्या 42 वर्षीय सोमेश्वर सपकाळ यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. सध्या शेतांमध्ये ज्वारी खळे सुरू आहेत. आणि त्यामुळे सोमेश्वर यांनी काल दिवसभर शेतामध्ये काम केले. कालची आपली कामे संपवून, शेतातच उभारण्यात आलेल्या आखाड्यावर, ते झोपी गेले. सकाळी सोमेश्वर यांचा भाऊ शेतावर गेल्यावर, त्यांन सोमेश्वर याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोमेश्वर कडून कोणतीही हालचाल होत नसल्याने, त्यांनी जवळ जाऊन पाहिले. त्या वेळी सोमेश्वर हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी सोनपेठ पोलिसात उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसत आहे. विदर्भातील अकोला येथे 46.3 अंश सेल्सिअस अशी उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. इतर शहरांच्या तुलनेत 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट आली आहे. कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गोव्या सह संपूर्ण राज्यात 28 एप्रिल रोजी कोरडे हवामान आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अकोला येथे 46.4 इतके तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे शहराचे आज 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशा स्वरुपाचे तापमान पुढील किमान दोन ते तीन दिवस राहणार असल्याचे पुणे हवामान विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours