मुंबई, 1 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. PM मोदींची वर्धा येथे पहिली सभा होणार आहे. या सभेला येण्याआधी मोदींनी ट्विटवरुन मराठीत ट्वीट केले आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यात भाजप-शिवसेना युती देखील मागे नाही. यासाठीच मोदी राज्यात 8 सभा घेणार आहेत. 
महाराष्ट्रात येण्याआधी मोदींनी ट्वीटकरुन राज्यातील जनतेला नमस्कार केला आहे. आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 
तसेच केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आ) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे! असे दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours