अलिबाग, 01 एप्रिल : अलिबाग तालुक्यातील कुरुळ इथे रविवारी रात्री गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकजण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.
सागर पाटील असं गोळीबारात मृत झालेल्या तरुणाचं नाव असून गौरव भगत असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. गौरवची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं आहे . हे दोघे आपल्या मित्रांसह रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुरुळच्या दत्त टेकडी येथून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
हा हल्ला नेमका कशातून झाला हे समजू शकलेलं नाही मात्र पूर्व वैमानस्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी निलेश वाघमारे याला ताब्यात घेतलं असून अन्य दोघे फरार झाले आहेत . घटनास्थळी पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours