मुंबई, 27 मे: मुंबईतील गोवंडी परिसरात दोघांवर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी गोळीबार झाला असून जखमींवर पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात देवनार पोलीस तपास करत आहेत. 
संपत्तीच्या वादातून सकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपत्तीच्या वादातून हा सर्व प्रकार झाल्याचे समजते. ज्या दोघांवर गोळीबार करण्यात आला ते आरोपींना ओळखत होते. संबंधित आरोपी पालघरवरून आले होते. रात्रभर ते गोवंडीतच होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या वादातून गोळीबार झाला. दरम्यान, आरोपींवर देखील गोळीबार करण्यात आल्याचे समोर येत आहे. 
हा हल्ला 4 ते 5 जणांनी हल्ला केल्या असून एका हल्लेखोरास पकडण्यात आले आहे. अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एकाच ताब्यात घेण्यात आल्यामुळे अन्य आरोपींचा शोध घेण्यास वेळ लागणार नाही असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours