माढा, 27 मे: माढा लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय सभेत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. मीच खरा नाईक निंबाळकर आहे, माझा डीएनए तपासला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पिढ्या नाईक निंबाळकरच असतील. तुमच्या आई वडिलांच लग्न झालेला दाखला आणणाऱ्याला 1000 रुपयांचं बक्षीस देईन. रामराजे हे बिन लग्नाची औलाद आहे अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांच्या या टीकेनं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours