मुंबई, 6 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 'नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. केजरीवाल यांच्या सुरक्षेत कोणतीही फट राहता कामा नये. एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे काय म्हणालेत?
- अरविंद केजरीवाल यांनी गेल्या चार वर्षांत जेवढय़ा ‘थप्पड’, ‘चपला’ खाल्ल्या आहेत तो एक विक्रमच म्हणावा लागेल. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत व लोकशाही मार्गाने ते निवडून आले आहेत. ते कुणाला नको असतील तर त्यांचा पराभव त्याच मार्गाने करावा लागेल. मारहाण करणे हा मार्ग नाही.
- केजरीवाल यांची प्रकृती मुळातच तोळामासाची आहे. त्यामुळे अशा थपडांनी ते कोलमडून जातात. राजकारणात व एकंदरीत समाजातच असहिष्णुता वाढत आहे व लोक मुद्दय़ांवरून गुद्यांवर येत आहेत.
- शरद पवार यांच्या बाबतीत हा असलाच घाणेरडा प्रकार दिल्लीत झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात प्रवक्त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्यावर ‘बूट’ फेकण्यात आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours