रिपोर्टर: प्रविण तांडेकर,  भंडारा
भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण वाळू घाटावर शासनाने रोख लावली असली तरी मोहाडी तालुक्यात सर्रास नदी पात्रातून वाळूचा उपसा होत आहे तर वाळू नसलेले डम्पिंग महसूल प्रशासनाने लिलाव केले आहे त्यामुळे महसुली अधिकाऱ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे  

भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी असून वाळू माफिया सर्रास नदी पात्रात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मिळेल त्या प्रमाणे वाळूचा उपसा करतात मात्र या वाळू माफियांना इतकी हिंमत येते कुठून तर यामागे अधिकारी असल्यामुळे माफियांना चोरी करणे सोपे जाते, तसाच काहीसा प्रकार मोहाडी तालुक्यातील बेटाला,धिवरवाडा,रोहा,या  वाळू घाटावर आपल्याला पाहावयास मिळत आहे, बेटाला वाळू घाटावर ४२३ ब्रास डम्पिंग वाळूचा लिलाव करण्यात आले आहे मात्र प्रत्येक्षात पहिले तर या ठिकाणी ४० ब्रास सुद्धा वाळू नाही मग या डम्पिंगचा लिलाव केला तरी कशा अशा प्रश्न आपल्याला पडत असेल, पण तस काही नाही वाळू माफिया यांनी ४० ब्रास असलेली डम्पिंग खरेदी केली खरी मात्र याच डम्पिंगवर नदी पात्रातील वाळू रात्रीच्या सुमारास ट्रकटरच्या साहाय्याने टाकून ४० च्या जागी ४ हजार ब्रास वाळूचा पहाड तयार करून याची उचल माफिया करतात या मागे महसुली अधिकारी सुद्धा सहभागी असतात त्यामुळे असे करणे शक्य जात असून  अशा अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याची गरज आहे, तरच शासनाचा लाखो रुपयांचा महसून बुडणार नाही 

BYTE - ड्रा. पंकज कारेमोरे. युवा नेते कांग्रेस 
BYTE - राजू कारेमोरे, 
BYTE - केशव शेंडे, स्थानिक

विडियो देखे-

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours