मुंबई, 13 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये झंझावाती सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा कंबर कसली आहे. ठाण्यात मनसेनं कार्यकर्ता मार्गदर्शनपर मेळाव्याचं आयोजन केलं असून राज ठाकरे या मेळाव्याला हजर राहणार आहेत. यावेळी दुष्काळाबाबत देखील चर्चा केली जाणार आहे. राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. टिपटॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत पत्रकार, पक्षातील नेत्यांचे स्वीय सहाय्यक यांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे दुष्काळाच्या प्रश्नावर काय मार्गदर्शन करणार, रणनिती काय आखणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत सत्ताधारी पक्षांविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला होता. शिवाय, आक्रमक भूमिका देखील घेतली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours