कोल्हापूर, 13 मे : आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे इथं ही घटना घडीला आहे. 

मुलगा दररोज दारू पिऊन पैशांची मागणी करत शिवीगाळ करत असे, असा आरोप संबंधित आई-वडिलांनी केला आहे. या कारणातूनच मुलाला विष पाजल्याची कबुली आई-वडिलांनी दिली आहे. अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील अरुण वाळवेकर आणि आई रेखा वाळवेकर यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मानलेला मामा आणि इतर अन्य दोघांचा समावेश आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. चंद्रपुरातही हत्येची घटना समोर आली आहे. वडील आणि भावाने मुलीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. योगेश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथला रहिवासी होता.

योगेश जाधव या घुग्घुस येथील तरुणाचे घुग्घुस येथील मुलीसोबत प्रेमसंबध होते. योगेशला रविवारी त्याच्या मैत्रिणीने भेटायला बोलवलं. पण मुलीसोबत भेट होण्यापुर्वी प्रभुदास धुर्वै आणि क्रिष्णा धुर्वै या पितापुत्राने चारगाव इथून योगेशला बळजबरीने मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर यवतमाळ जिल्हयाच्या हद्दीत निलजईच्या जंगलात त्याला बेदम मारहाण करुन दगडाने ठेचून योगेशची हत्या केली. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours