बुलडाणा- खामगाव शहरातील संजिवनी कॉलनीत एका 27 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या मृतक तरुणीचे नाव अश्विनी सुधीर निंबोकार असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आणि आरोपीचा शोध घेतला असता अश्विनीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्यानेही शेगाव येथे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करणायचा प्रयत्न केला. त्याला अकोला येथ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत अश्विनी निंबोकार ही खामगाव शहरातील सनी पॅलेस भागात राहत होती. अश्विनी आणि आरोपी सागर निंबोळे यांचे मागील 4 ते 5 वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. एकाच समाजातील असल्याने त्यामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी लग्न ठरविले होते. मात्र मुलाचे वडील हुंडा जास्त मागत असल्याने दोघांला लग्नाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतलेलय होत्या. अशातच आज अश्विनीचा मुक्त विद्यापीठाचा पेपर होता. दुपारी पेपर झाल्यावर दोघांची घटनस्थळावर भेट झाली. मात्र दोघांत काहीतरी वाद झाला आणि आरोपी सागरने तिच्या अंगावर सलूनच्या वस्तऱ्याने सपासप वार केले. तिच्या डोळ्यात स्क्रू ड्रायव्हरने वॉर केले. त्यामुळे अश्विनी जागीच मरण पावली. आरोपी गटनस्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेगाव रेल्वे स्थानकावर आरोपीने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours