मुंबई- देशात मोदी-शहा जोडीचा प्रयोग फसला आहे. म्हणूनच 5 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर पत्रकार परिषद घ्यावी लागली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाचे मोठं नुकसान झालं आहे. या निवडणुकीत मात्र परिवर्तन होणार आहे.पाच वर्षांनंतर पीएम यांना प्रेस घ्यावे वाटली, हा बदल का झाला. कारण लोकांची नाराजी त्यांना समजली आहे, असंही चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण आज सोलापुरात आहे.राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून त्यात राज्यातील दुष्काळ भयानक परिस्थिती समोर आली आहे. दुष्काळाबाबत सरकारने आश्वासन दिले. मात्र, अंमलबजावणी केल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शब्दखेळ करतात. सध्या त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स खेळ सुरु आहे. दुष्काळग्रस्तांची मतं घेतली, पण समस्या काय? याकडे पाहिले नाही, उपेक्षा केल्या. सरकारला जाग आलेली नाही. केंद्र सरकारने 4 हजार 300 कोटी रूपयांची जिल्हानिहाय मदत काय केली, याचा हिशेब आधी सरकारने द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदी परिवर्तन होईल, विधिमंडळ काँग्रेस नेत्यांची मिटिंग होईल, विरोधी पक्ष नेते आणि गट नेते पदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली आहे.राज्यात आम्ही एकत्रित जोमाने लढलो, काहीजण जाणार ते जातील, विधानसभा निवडणूक जोमाने लढणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले. मनसेला सोबत घेणार की वंचित बहुजन आघाडीला, या प्रश्नावर 23 मेच्या निकालनंतरच बोलेल, असंही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित राहिले आहेत.
पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
पत्रकार परिषदेदरम्यान 2014 मधील लोकसभा निवडणुकांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, '16 मे रोजी निकाल आले होते, यानंतर 17 मे रोजी मोदी सरकार सत्तेत येताच भ्रष्टाचाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागली होती. यावेळेस सट्टेबाजांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या 150 जागांसाठी आणि भाजपच्या 218 जागांसाठी सट्टा लागला होता. पण मी शपथ घेण्याआधीच सर्वांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आणि 17 मेपासून प्रामाणिकतेची सुरुवात झाली होती', असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
Post A Comment:
0 comments so far,add yours