मुंबई, 18 मे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकावर जोरदार टीका करणारे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाच्या आधी मोदींनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे यांनी ट्विटकरत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 19 मे रोजी मतदान होत आहे. यासाठीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. पण मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याउलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हा पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षांची आहे त्यामुळे मी उत्तर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 
PM मोदींच्या या उत्तरावरून राज यांनी “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,असे ट्विट करत त्यांच्या काहीच न बोलण्यावर निशाणा साधला. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours