मुंबई- महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हे आदेश जारी केले आहेत. देवेन भारती यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे एटीएस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी IPS अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. त्यात 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि पत्रकार जे.डे.हत्याकांडचा समावेश आहे.
देवेन भारती यांनी दहशतवादी संघटना 'इंडियन मुजाहिदीन'चे कंबर तोडण्यात सक्रिय भूमिका पार पाडली. निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन काही दिवसांपूर्वी देवेन भारती यांची ज्वॉइंट कमिश्नर इकोनामिक ऑफेंस पदावर नियुक्ती करण्यात आली होती. याआधी त्यांनी ज्वॉइंट कमिश्नर लॉ अॅण्ड ऑर्डरचे नेतृत्त्व केले होते.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमातीपस कलम 22 (न) च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वमान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदली करण्यात आली आहे. यात देवेन भारती, अतुल कुलकर्णी, प्रताप दिघावकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours