मुंबई, 14 मे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी 'तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुलगा रितेश देशमुखला चित्रपटामध्ये काम मिळावं यासाठी प्रयत्नशील होते.' पियुष गोयल यांनी केलेल्या या विधानावरून आता अभिनेता रितेश देशमुखनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'माजी मुख्यमंत्र्यांबद्दल प्रश्न विचारणे हा तुमचा अधिकार आहे. पण, जी व्यक्ती जिवंत नाही त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं असल्याचं ट्विट रितेश देशमुखनं केलं आहे. शिवाय, मला चित्रपटामध्ये काम मिळावं यासाठी वडिलांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याला फोन केला नव्हता. याचा मला अभिमान आहे,' असं उत्तर रितेशनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना दिलं आहे. 2012मध्ये विलासराव देशमुख यांचं निधन झालं. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours