नवी दिल्ली, 20 मे: लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान झाल्यानंतर रविवारी रात्री न्यूज 18च्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर आणि निर्णयांवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. निवडणुकीच्या प्रचारात देखील विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता. सरकारने गेल्या 5 वर्षात अनेक अशी कामे केली आहेत ज्याची छाप जनतेच्या मनात अद्याप आहे.
मोदी सरकारचे असे कोणते निर्णय आहेत ज्यामुळे एक्झिट पोलने एनडीएला 300 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. जाणून घेऊयात मोदी सरकारचे काही निर्णय ज्यामुळे एनडीएला पर्यायाने भाजपला हे यश मिळण्याची शक्यता आहे.
नोटाबंदी- मोदी सरकारने जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यावर सर्वात मोठा वाद झाला होता. तेव्हा चलनात असलेल्या 15.41 लाख कोटी रुपयांच्या नोटा रद्द झाल्या होत्या. नंतर त्यातील 15.30 लाख कोटी नोटा पुन्हा जमा झाल्या होत्या. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. पण काहींच्या मते या निर्णयामुळे करदात्यांची संख्या वाढल्याचे मानले जाते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours