नागपूर, 13 जून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन नराधमाने बलात्कार केला आहे.
नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 376 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीच्या घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची ही दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदी ऐरणीवर आला आहे.
आई-वडील कामावर, घरी साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

आई-वडील कामावर गेले असताना घरी असलेल्या त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना नागपूरमध्ये घडली असून चिमुकलीवर बलात्कार करणारा 25 वर्षीय आरोपी फरार झाला आहे.
नागपूरच्या वाडी भागात साडेतीन वर्षांची मुलगी घरी ठेवून दाम्पत्य कामावर गेलं होतं. आई-वडील कामावर गेले असल्याने साडेतीन वर्षाची लहानगी शेजारी असणाऱ्या लहान मुलांसोबत खेळण्यात दंग होती. त्यानंतर तिथं आलेल्या भूषण दहाट या आरोपीने त्या चिमुकलीला बाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर वाडी परिसरात संतापाची लाट पसरली आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्यानंतर 25 वर्षीय आरोपी भूषण दहाट हा तिथून फरार झाला. दरम्यान, या घटनेबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours