औरंगाबाद, 11 जून : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यानंतर खैरेंचा पराभव हा माझा पराभव असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावरून आता निवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.
'उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यायला हवी. एमआयएमचा विजय झाल्याने आता राज्यभर चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही शिवसेनेचा पराभव करून वंचित बहुजन आघाडी औरंगाबादमधील सातही जागा जिंकेल,' असं म्हणत इम्तियाच जलील यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours