नवी दिल्ली, 17 जून : ICC Cricket World Cup मध्ये रविवारी (16 जून) झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 89 धावांनी हरवलं. भारतानं पाकिस्तानसमोर 337 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पावसामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 षटकांत 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं मात्र त्यांचा खेळ 212 धावांवर आटोपला आणि भारताने 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कपदरम्यान भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टीम इंडियाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याचं हे ट्विट सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे.
'आणखी एक स्ट्राईक'
टीम इंडियाच्या विजयावर अमित शहा यांनी ट्विट केलं की,'टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि याचे परिणामदेखील तसेच दिसून आले आहेत.'
Post A Comment:
0 comments so far,add yours