भिवंडी, 18 जून : भिवंडीमध्ये चोर समजून एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कामगाराने मध्यरात्रीच्या वेळी सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्याने नागरिकांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रात्री जुनी माऊली बिल्डिंग, अजंठा कंपाऊंड इथं घडली आहे.
जोखईप्रसाद रामचरित्र मोर्या उर्फ अभिषेक ( 28 रा.अकबर शेठ बिल्डिंग,अजंठा कंपाऊंड ) असं मारहाणीत मृत्यू झालेल्या कामगाराचं नांव आहे. सदर कामगार आलम शेठ यांच्याकडे सोफा सेटच्या कापडाच्या डिलिव्हरीचं काम करत होता. 11 जून रोजी त्याने अचानक शेजारच्या इमारतीच्या सोसायटीत प्रवेश केला. तो मध्यरात्री गेल्याने स्थानिक रहिवाश्यांनी त्याच्यावर चोर असल्याचा संशय घेऊन त्याला लाथा बुक्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours