मॅंचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला 89 धावांनी नमवतं, वर्ल्ड कपमधला इतिहास कायम ठेवला. पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताला नमवण्यात यश आलेले नाही. मात्र, पाकिस्ताननं सामना गमावल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्ताची टीम एका नाईट पार्टीत मश्गुल असल्याचं एका व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये टीमसोबत शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिय मिर्झाही दिसते होती. हा VIDEO व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाची पुन्हा एकदा धुलाई केली.
मँचेस्टरच्या प्रसिद्ध शीशा नाईट क्लबमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या पत्नीही गेल्या होत्या. तिथे त्यांनी मौज-मस्ती केली. काही पाकिस्तानी खेळाडू हुक्का पितानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमच्यासोबत आमची मुलंही होती हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे, असे मत व्यक्त केले होते. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours