मुंबई 18 जून : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे – पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, यामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल असं देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे भाजपनं गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. 17 जून रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यपालांनी दिली शपथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदाची शपथ दिली.
अजित पवार यांचा सवाल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाबाबत सवाल केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सतीश तळेकर यांनी सरकारच्या या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours