मुंबई 18 जून : आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या, शांती आणि विश्व बंधुत्वासाठी काम करणाऱ्या सात व्यक्तींचा द वर्ल्ड पीसकिपर्स मुव्हमेंटच्यावतीने गौरव करण्यात आलाय. मंगळवारी (18 जून) रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील वोक्हार्ट संस्थेच्या आवारात हा गौरव सोहोळा झाला. द वर्ल्ड पीसकिपर्स मुव्हमेंटचे संस्थापक सर डॉ हुज यांच्या हस्ते या सात शांतीदुतांचा सत्कार करण्यात आला. द वर्ल्ड पीसकिपर्स ही फेसबुकच्या माध्यमातून शांततेसाठी चालणारी सुमारे 2 लाख लोकांचा सहभाग असलेली एक चळवळ आहे. आभार,  क्षमा,  प्रेम, विनम्रता, दानत, धैर्य आणि सच्चाई या 7 शांती मूल्यांचा यात समावेश आहे. आंतरिक शांतीसाठी हे पाऊल असून मानवतेच्या आंतरिक शांतीच्या माध्यमातून विश्व शांतीचे स्वप्न साकार होऊ शकते अशी या संघटनेची भावना आहे.
हा गौरव अखंड मानवतेच्या शांतीसाठी तसेच सेवा आणि समृद्धीसाठी काम करण्यासाठी प्रतिबद्ध असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. "विश्व शांति राजदूत" म्हणून या सातजणांचा गौरव करण्यात आला असून त्यांना मानपत्र, गौरवचिन्ह, तसेच  चांदीचं एक नाणं देवून गौरवण्यात आलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours