साकोली रिपोर्टर: क्षिरसागर
साकोली : तालुक्यातील कुंभली गावाजवळ चुलबंद नदीपात्रात काळीपिवळी प्रवासी वाहन कोसळून सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनात पंधरा प्रवासी असल्याचे समजते. सदर घटना आज मंगळवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. 
मृतकांमध्ये गुनगुन दिनेश पालांदूरकर रा.गोंदिया, शितल राऊत व अश्विन सुरेश राऊत रा.सानगडी, शिल्पा कावळे रा.सासरा तर जखमींमध्ये सिध्दी पालांदूरकर रा.गोंदिया , डिंपल सुरेश कावळे, जनाबाई अभिनव सतिमेश्राम, शुभम नंदलाल पातोडे रा.तई/बारव्हा यांचा समावेश आहे. वृत्त लिहेस्तोवर मृतकांमधील इतर दोघांची ओळख पटविण्यात आली नव्हती. गंभीर जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहेत. वाहनातील बहुतांश तरूणी ह्या साकोली येथे महाविद्यालयात प्रवेशाकरिता गेल्या असल्याचे सांगण्यात येते. सदर वाहन लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथील हटवार नामक व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. वृत्त लिहेस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours