नवी दिल्ली, 19 जुलै : आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर अखेर पाकिस्तान झुकलं आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली. 17 जुलै रोजी न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय देत पाकिस्तानला दणका दिला. या निर्णयानंतर आता जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेस (councillor access) देण्यात येणार आहे. याद्वारे त्यांना राजनैतिक संपर्काचा अधिकार देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, 'ICJच्या निर्णयाचं पालन करत 'व्हिएन्ना' करार अंतर्गत जाधव यांच्या Councillor Access वर त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली. पाकिस्तानी कायद्यानुसार त्यांना Councillor Access दिला जाईल, यासाठीच्या कार्यप्रणालीवर कामदेखील सुरू करण्यात आलं आहे'. या निर्णयामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडलं आहे. दरम्यान, पाकिस्ताननं जाधव यांना यापूर्वी तब्बल 16 वेळा राजनैतिक संपर्काचा अधिकार देण्यास नकार दिला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours