नवी मुंबई, 13 जुलै : नवी मुंबईमध्ये तिहेरी हत्याकांड झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे एमआयडीसीमध्ये भंगार विक्री करणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आली आहे. तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यात आणि पोटात वार करून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 9च्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बंद कंपनीत मृत तिघांचे भंगाराचे दुकान होते. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात तिघांचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
इर्शाद वय 20 वर्ष, नौशाद वय 17 वर्ष, राजेश वय 28 अशी हत्या झालेल्या तीघांची नावं आहे. वर्षआर्थिक वादातून किंवा चोरीच्या उद्देशाने या तिघांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच बंद कंपनीतून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
एकाच वेळी, एकाच ठिकाणी तिघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. पण अद्याप हत्या कोणी आणि का केली याचं ठोस कारण समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours