मुंबई, 18 जुलै- मुंबई पोलिसांनी काशिमिरा परिसरात राजरोसपणे सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. पोलिसांनी पार्लरवर धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांच्या जावई हे पार्लर चालवत होता. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तो फरार झाला आहे. मनीष मकवाना असे त्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिमिरा परिसरातील एका गाळ्यात अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह पार्लरवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या पार्लरचा व्यवस्थापक मजबूर खान, कॅशियर रूद्रेश पवार, वेट इम्रान शेख आणि दोन ग्राहकांचा समावेश आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक मनीष मकवाना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष मकवाना सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई असल्याने पोलीस काय कारवाई करतात, याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours