मुंबई 8 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांच्या सर्व प्रश्नांवर सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचं आश्वास दिल्याने मंगळवारचा रिक्षा चालकांचा संप संघटनेनं मागे घेतलाय. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांनी ही घोषणा केली. मंगळवारी शशांक राव हे प्रतिनिधी मंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या बैठीक तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
8 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रिक्षा चालक-मालकांच्या संघटनेनं घेतला होता. भाडेवाढीच्या मुख्य मागणीसह राज्यातले 20 लाख रिक्षा चालक-मालक संपावर जाणार होते. साहजिकच मुंबई उपनगरांतील रहिवाशांसह राज्यभरात रिक्षावर अवलंबून असणाऱ्या नागरीकांचे खूप हाल होण्याची शक्यता होती.
ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र या संघटनेनं याआधी परिवहन मत्र्यांना आपल्या मागण्या पत्राद्वारे कळवल्या आहेत. त्यासंबंधी याआधीही अनेक बैठका घेण्यात आल्या. पण त्यावर सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं गेलं नव्हतं. त्यामुळे थेट संपाचा निर्णय घेण्यात आला होता. या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 9 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला रिक्षा चालकांकडून घेण्यात आला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours