मुंबई, 09 जुलै : एकीकडे सगळ्या राजकीय पक्षामध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर मुख्यमंत्री कुणाचा होणार? असा वाद अजुनही पेटत आहे. आता या प्रश्नांवर काही नेत्यांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आज सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा 'आमच ठरलंय' असं सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सुनावलं आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं सांगणाऱ्या नेत्यांना सामना अग्रलेखातून युतीच्या प्रकृतीस ओरखडा न आणन्याचं बाळकडू ही देण्यात आलं आहे. युतीतल्या मुख्यमंत्रिपदाच्या वादात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही उडी घेतली होती. कोण म्हणालं मुख्यमंत्री भाजपचा असणार नाही, असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. ते औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच विधानसभेच्या तयारीला लागण्याची भाजपला गरज नसल्याचं यावेळी दानवे म्हणाले. तर भाजपची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत, येईल त्याला भाजपमध्ये एंट्री असेल, असंही दानवे म्हणाले होते. त्यावर आता  पाहुयात सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ते...
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours