नागपूर, 09 जुलै: नागपूर विद्यापीठाने एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात नुकताच संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या हतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा देखील आहे. या भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठात पहिल्यांदाच संघाचा इतिहास शिकवला जाणार असल्याने या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज्य नव्हे तर देशपातळीवर होऊ शकतो वाद
नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयामुळे राज्य नव्हे तर देशपातळीवर वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे झाला निर्णय?
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर RSSप्रणीत शिक्षण मंचाचा वरचष्मा आहे. त्यामुळेच संघाच्या इतिहासाचा समावेश अभ्याक्रमात करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा या आदेशामुळे तत्कालीन मानव संसाधन मंत्री मुरलीमनोहर जोशी यांच्यावर तसेच भाजपवर शिक्षणाचे भगवेकरण करण्यात आल्याची टीका करण्यात आली होती. आता थेट विद्यापीठाने हा निर्णय घेतल्यामुळे राजकीय पातळीवर देखील यावर टीका होऊ शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours