● तरुणाचा अभिनय उकक्रम ●  
●व्हाँटसप गृपच्या माध्यमातून समाज कार्य ●
    चिचाळ- मंडई पेठ अड्याळ येथे देवाजी भुजाळे यांच्या निवासस्थानी अडयाळ येथील सामाजिक कार्याची  काम करण्याची ईच्छा शक्ती व गावाचा विकास ,गावातील समस्या चे निवारण करण्याचे उध्दान्त हेतु ठेवून गावातील वरीष्ठ व बुध्दीजीच्या मार्ग दर्शनात गावतील समस्या मार्गी लावण्यासाठि सभा घेण्यात आली.                                                  सभेला गावातील संपूर्ण व्हाँटसप गृपला निमंत्रित करण्यात आले. सभेला शेकडो तरुण व आबालवृध्दानी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी 'युनिटि पाँवर' व्हाँटसप गृप ची निर्मीती सर्वानुमते करण्यात आली.     
             तर गृप मध्ये राजकिय क्षेत्रवगळता सामाजीक कार्य करण्याची सर्वानी अनुमती दिली.  गृप सभासद नोंदणी करण्याची सर्वाना सुचना देण्यात आली.तर गृपची नियमावली गृप मध्ये लवकरच प्रकशित करणार असल्याचे संघटकांनी उपस्थितांना सांगीतले.             
       कार्यक्रमाचे संचालनमुनिर शेख व आभार मनोज कोवासे यांनी केले. सभेला मोठ्या संख्येनी युवकांनी उपस्थिती दर्शविली होती.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours