मुंबई, 28 जुलै: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांना पक्ष टिकवायचा आहे त्यामुळे अशा प्रकारची आश्वासनं आणि वक्तव्य केली जात आहेत. सगळ्यांचा विश्वास आता भाजपवर आहे. आम्हाला सूडच घ्यायचा असता तर घाईगडबडीत केलं. पण कामकाज नियमानुसार होत असल्यामुळे ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांना चौकशीला सामोरं जावंच लागणार. शरद पवार यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येतील अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी न्यूज 18 नेटवर्कला अशी प्रतिक्रिया दिली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours