मुंबई, 28 जुलै : मुंबई आणि परिसरात शुक्रवारपासून पावसानं सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (28 जुलै)पहाटेपासूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. IMDनुसार रविवारीदेखील मुंबईतील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं IMDकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आलं आहे. रविवारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या प्रवक्त्यांनी दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours