रत्नागिरी 10 जुलै : आमदार नितेश राणे यांनी ज्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राडा केला होता तो रस्ता अखेर आता दुरुस्त होतोय. गेली काही दिवस झालेल्या वादामुळे ठेकेदाराला जाग आली आणि त्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केलीय. योगायोगाने नितेश राणे यांना आजच कोर्टानं जामीनही मंजूर केलाय. कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करून घेणारच असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
नितेश राणेंना जामीन मंजूर
इंजिनिअरला चिखलाने आंघोळ घातल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे. ओरोस न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यासह इतर 18 आरोपींनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. मात्र कोर्टाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रवीवारी कणकवली पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लावावी लागणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours