बीड, 11 जुलै : खासगी सावकारी फास शेतकऱ्यांच्या गळ्याला वरचेवर जास्तच आवळत आहे की काय असं म्हणायची आता वेळ आली आहे. कारण, बीड जिल्ह्यात खासगी सावकारीने डोकं वर काढलं आहे. बीड जिल्ह्यातील बेलुरा गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडे शेती गहाण ठेवलेल्या  शेतकऱ्यांनी सावकारासमोरच विष प्राषण केल्याचा प्रकार घडला आहे. बरं इतकंच नाही तर हा सर्व प्रकार सावकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करत होता.
या सर्व प्रकारात शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदाम फपाळ असं मृत्यूशी झुंज देत असलेल्या या शेतकऱ्याचं नाव आहे. सुदाम यांनी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने खाजगी सावकार विलास फफाळ याच्याकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. त्याबदल्यात पावणेचार एकर शेती सावकाराकडे गहाणदेखील ठेवली होती.
या दरम्यान, तब्बल 5 लाख रुपये या शेतकऱ्यांनी परतफेड केले होते. जेंव्हा शेती परत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र या सावकाराची नियत हेरली आणि शेतीवर कब्जा केला. निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबासमोर आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. सावकाराच्या या वागण्यामुळे माणूसकी आता राहिली नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours