मिरज, 15 जुलै : 'भाजपचे ओळखपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. कारण आयकार्डवर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे,' असा दावा भाजपचे सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. हाळवणकर यांच्या दाव्यामुळे सरकारकडून टोल जमा करताना पक्षपातीपणा करण्यात येतो का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगलीतील मिरज इथं केला. ते भाजप बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.
पक्षाच्या आमदारानेच हा धक्कादायक दावा केल्याने भाजपवर टीका होत आहे. कारण त्यांनी थेट बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करत हा दावा केला आहे. टोल वसूल करताना एका ठराविक पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून सवलत मिळत असेल तर हा पक्षपातीपणा नाही का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours