मुंबई 15 जुलै : डॉक्टरांवर पेशंटच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आज पुन्हा मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका पेशंटच्या नातेवाईकांनी तीन डॉक्टरांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली आणि हॉस्पिटलमधल्या सामानाची तोडफोड केली.  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या एका पेशंटचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे त्या पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी राडा केला.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कुठलंही कारण ऐकून न घेता डॉक्टरांवर हल्ले करायला सुरुवात केली. यात तीन डॉक्टरांना मारहाण झाली तर हॉस्पिटलमधल्या सामानांचीही त्यांनी तोडफोड केली. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झालाय.  सरकारने तातडीने निवासी डॉक्टरांना संरक्षण पुरवावं अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. या नातेवाईकांनी फक्त एवढच केलं नाही तर डॉक्टरांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ले केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours