भुसावळ, 13 जुलै- तापी नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही युवक यावल तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी होते. या दुखद घटनेने पाडळसे गावावर शोककळा पसरली आहे. दोघे मित्रांसोबत तापी नदीवर फिरायला आले होते.
जयेश नारायण झोपे व प्रेम चंद्रशेखर चौधरी अशी मृतांची नावे आहेत. दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोन मित्र त्यांच्या अस्वस्थ झाल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेह भुसावळ नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत. यावलचे आमदार हरिभाऊ जावळे व पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दोन एलआयसी एजंट मित्रांचा तलावात बुडून मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत नागपूर येथून फिरायला आलेल्या दोन एलआयसी एजंट मित्रांचा हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी येथील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली होती. मात्र, शनिवारी दुपारी या परिसरातील काही नागरिकांना तलावाच्या काठावर दोन मोटारसायकली बेवारस आढळून आल्या. तसेच पाण्यावर प्रेत तरंगताना दिसले. तेव्हा ही घटना उघडकीस आली.
कमलेश रमेश शाहकार(वय-36,रा.कळमना, नागपूर) देबोजित कल्याणजी बॅनर्जी (वय-36,रा.दुर्गावती चौक, पाचपावली, नागपूर) असे या दोन्ही मित्रांची नावे आहेत. ते दोघेही मागील दहा वर्षांपासून एलआयसी एजंट म्हणून काम करत होते. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यांच्या जवळच्या ओळखपत्र वरून नातेवाईकांना सूचना देण्यात आली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours