अमरावती, 14 जुलै : 'अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारींमुळेच झाला,' अशी तक्रार शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा विजयी रॅलीमध्ये अनंत गुढे यांच्या पत्नी विजया गुढे यांनी खासदार राणा यांचा सत्कार केला. तसंच अनंत गुढे यांनी एका सभेत नवनीत राणाच खासदार होणार, असा उल्लेख केला होता. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ अडसूळ यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली केले आहेत.
आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी खासदार अनंत गुढे यांनाही बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मातोश्रीवरून अनंत गुढे यांच्यावर कारवाई करण्यात येणार का, हे पाहावं लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours