मुंबई, 17 जुलै : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला वापर समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आघाडी करताना जागावाटपात याआधी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. पण आता चित्र बदललं असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. कारण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तसंच आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत उजवी ठरली आहे. याचाच दाखला देत आता राष्ट्रवादीने 50-50 चा फॉर्म्युला मांडला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसनं मात्र जागावाटबाबत नवा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे. मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील. तसंच ज्या जागांवर जो पक्ष दुसऱ्या नंबरवर होता ती जागा त्या पक्षाकडे जाईल, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला 106 आणि राष्ट्रवादीकडे 95 जागा जातील. तर उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होऊ शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours