मुंबई, 17 जुलै: मुंबईतील डोंगरी परिसरात काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवरील सर्व उपचार राज्य सरकारकडून केला जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही ढिगारा काढण्याचे काम सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बुधवारी सकाळीही मदत आणि बचाव काम सुरु आहे. आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी एका लहान मुलासह 9 जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours