औरंगाबाद, 22 जुलै : 'जय श्री राम' या घोषणेवरून देशभरात राजकारण्यांसह आता सर्वसामान्य जनतादेखील राजकारण करत असल्याचं दिसत आहे. या नारेबाजीवरून काही समाजकंटक वातावरण ढवळून काढत असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातही रविवारी (21 जुलै) असाच काहीसा प्रकार घडला आहे. झोमॅटोचे दोन डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असताना परिसरातील काही जणांनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. कहर म्हणजे या डिलिव्हरी बॉयना 'जय श्रीराम'चे नारे लावण्यासही जबरदस्ती केली. शहरातील आझाद चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, औरंगाबादेतील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours