मुंबई 3 जुलै : राज्य शासनाच्या 'मेगा भरती'चा मार्ग अखेर मोकळा झालाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण विधेयकामुळे त्या निर्णयाला राज्य सरकारला स्थगिती द्यावी लागली होती. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर बुधवारी राज्यपालांची सही झाली आणि राजपत्र झालं जाहीर झालं. त्यानंतर मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालाय.
मराठा समाजाला शैक्षणिक 12 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाचा कायदा 1 जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला होणार सुरुवात. आतापर्यंत साधारण 20 हजार जागांसाठी जाहीराती  निघाल्या आहेत. राज्यात विविध विभागांमध्ये तब्बल 72 हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2018मध्ये केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours