मुंबई- मुंबईतील मालाड येथील इटालियन कंपनीच्या शेजारी असलेल्या नाल्याच्या मॅनहोलमध्ये 2 वर्षाचा चिमुरडा पडून तो बेपत्ता असताना मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) गलथानपणाने तिसरा बळी घेतला आहे. धारावीत अनाधिकृत झोपड्या बांधल्या जाऊ नये म्हणून केलेल्या खड्ड्यात पडून एका 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
सुमित मुन्नालाल जैस्वाल असे या मुलाचे नाव आहे. स्थानिकांनी त्यांना नाल्यातून बाहेर काढले. पण, तो बेशुद्धावस्थेत होता. सायन हॉस्पिटलमध्ये त्याला हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धारावीच्या पिवळ्या बंगल्याजवळही ही घटना घडली आहे. नाल्यात पडून मृत्यू झाल्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे.
धारावी परिसरातील निसर्ग उद्यानाजवळ मिठीनदीत पडून सुमितचा मृत्यू झाला आहे. मिठीनदी रुंदीकरणासाठी बीएमसीने गेल्या महिन्यात अनधिकृत बांधकाम तोडले होते. त्यावेळी नव्या झोपड्या बांधल्या जाऊ नये म्हणून भरणीला खड्डे करुन ठेवले होते. त्याच खड्यात पडून या सुमितचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याची आई सीमाने केला आहे. सीमा यांनी सांगितले की, मुलं रोजच खेळायला जायची. आजही सुमित भावाला घेऊन खेळायला गेला होता. आता आपल्याला न्याय कोण देणार, असा सवाल सीमा यांनी केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours