औरंगाबाद, 19 ऑगस्ट : धुळे-औरंगाबाद शहादा बसला भीषण अपघात झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. वेगात असलेल्या बसची कंटेनरला धडक बसली. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 13 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे.
धुळे-औरंगाबाद शहादा बस ही औरंगाबादवरून शहादाला जात होती. पण बसचा वेग जास्त होता आणि त्यामुळे समोर येणाऱ्या कंटेनरला बसने धडक दिली. कंटेनर समोर असतानाही बसचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला गाडी आवरता आली नाही. आणि भरधाव वेगात बस कंटेनरमध्ये शिरली. यामध्ये 11 प्रवशांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बसचा अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन मदतकार्यासह घटनास्थळी दाखल झालं. जखमींना बसमधून बाहेर काढून तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तब्बल 20 प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बसचा काही भाग हा कंटेनरमध्ये शिरला होता. त्यामुळे बसचा पत्रा कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours