नागपूर : नागपूर परिसरात गेल्या महिनाभरात दमदार असा पाऊस झाला नाही. या भागाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. नागपूरला पाणीपुरवढा करणाऱ्या तोतलाडोह धरणात 18 दिवसांपूर्वी पाणीसाठी शून्यावर होता. मात्र दोन आठवड्यात या धरणातला पाणीसाठी तब्बल 32 टक्क्यांवर आलाय. याचं सिक्रेट दुसरं तीसरं काही नसून मध्यप्रदेशात झालेला पाऊस हे आहे. मध्यप्रदेशला लागून असल्याने तिथे झालेल्या पावसाचा नागपूरला फायदा होते. मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने तिथलं चौराही हे धरण 94 टक्के भरलं. त्यातून विसर्ग झाल्याने ते पाणी तोतलाडोहला मिळालं आहे.
जेवढं पाणी तोतलाडोह धरणात साचल्या जाते त्यानुसार नागपूरला पाण्याचा पुरवठा होत असतो. आत्तापर्यंत पाणीसाठा नसल्याने नागपूरात पाणीकपात करण्यात येत होती. ऑगस्ट महिन्यापर्यंत आठवड्यातून तीनच दिवस पाणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. धरणातला पाणीसाठा किमान वाढला असला तरी खबरदारीचा उपया म्हणून पाणीकपात रद्द केली जाणार नसल्याचं प्रशासनाने सांगितलंय.
मध्य प्रदेश सरकारने चौराई धरणाच्या 8 दरवाजांपैकी काही दरवाजे उघडल्याने हे पाणी तोतलाडोहमध्ये आलंय. त्यामुळे नागपुरकरांना थोडा दिलासा मिळालाय. येत्या काही दिवसात नागपुरातील धरणांची स्थिती चांगली होईल असं जलप्रदाय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. पण तरीही 31 ऑगस्ट पर्यंत हा पाणी कपातीचा निर्णय कायम राहणार आहे. 31 ऑगस्टला जलप्रदाय विभागाची एक बैठक होणार असून त्यात सर्व अधिकारी चर्चा करणार आहेत. पावसाचा अंदाज, धरणांमध्ये असलेलं पाणी आणि पाण्याची गरज याचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours