मुंबई। युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आज विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात होती. यावेळी दिग्रसचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी आदित्य ठाकरेंना दिग्रस मतदारसंघातून निवडणुक लढवण्याचा आग्रह केलांय. इतकचं नाही तर त्यांनी फक्तं उमेदवारीचा फॉर्म भरण्यास यावे आम्हीच त्यांना सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून विजयी करू असं आश्वासनही दिलं. या निमंत्रणावर आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र 'जन आशीर्वाद यात्रा' राज्यात जीथे जाईल तीथं आदित्य ठाकरेंना निवडणुक लढवण्यासाठी आग्रह धरला जातोय, हे पुन्हा एकदा समोर आलं.
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
राज्यातल्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नेत्यांच्या यात्रा आणि सभांनी त्यात रंग भरलाय तर पक्षांतराने अनेकांना धक्के बसताहेत. भाजप आणि शिवसेनेचं चांगलंच जमलं असून आता जागावाटपाबद्दल चर्चा सुरू झालीय. कुणाला कुठल्या जागा याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य
ठाकरे यांना शिवसेना जोरदार प्रोजेक्ट करत असल्याने ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी चर्चा आहे. यावर जेव्हा आदित्य ठाकरेंना सोमवारी प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून सस्पेन्स आणखीच वाढला आहे. जनता देईल ती जबाबदारी घेणार असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours