पुणे: पुण्यात बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांना मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडला आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिलेला अनेक प्रकारे धमकावलं आणि संधी मिळताच तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकाराची माहिती मिळताच आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विपुल कासार(३९)असं आरोपीचं नाव आहे. विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवरील डीपी संग्रहित करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली. त्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन अशीही आरोपीकडून धमकी देण्यात आली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यावर तो सतत तिला फोन करायचा आणि तु मला खूप आवडतेस. तुला वेळ मिळेल तसं तु माझ्याशी बोलत जा आणि मला भेट असं आरोपी पीडित महिलेशी बोलायचा. घाबरलेल्या महिलेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेल्या पतीकडून आरोपी विपुल याला समज देण्यात आली.
या सगळ्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलेला संपर्क केला आणि तिचे संग्रहित केलेले व्हॉट्सअॅपवरील डीपी सोशल मीडियावर व्हायरल करू अशी तिला धमकी देण्यात आली. आरोपीने महिलेशी बोलण्यासाठी तिला एक मोबाईल आणि सिमकार्ड दिलं. जर माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारण्याची धकमी आरोपीकडून देण्यात आली. त्य़ानंतर घाबरून महिला आरोपीशी बोलत होती.
पीडित महिलेचा पती बाहेरगावी गेला असता आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यासगळ्या प्रकाराची माहिती पीडित महिलेच्या पतीला समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि चिखली पोलिसांनी आरोपी विपुल याला अटक केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours