गडचिरोली :   शेतातील मोटार पंप नादुरुस्त असल्याने फूटबाल दुरूस्तीकरीता विहीरीत उतरलेल्या रोजंदारी मजूर व शेतमालकाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज सांयकाळी सहावाजेच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात घडली. प्रमोद निर्मलदास डहाळे (40) व रोजंदारी मजूर अजय जयराम मच्छीरके (25) रा. चिखली असे मृतकांचे नावे आहेत.
प्रमोद डहाळे यांचे आंधळी फाट्यावर शेती आहे. सांयकाळी शेतातील विहीरीत मोटार पंपाच्या फूटबालमध्ये बिघाड असल्याचं त्यांचा लक्षात आलं. त्याने शेतात काम करणारा अजय मच्छीरके याला विहीरीत उतरवलं. मात्र तो पाण्यात पडून बूडू लागल्यानं काठावर असलेला शेतमालक प्रमोद डहाळे याने बचावाकरीता शेजारील शेतकऱ्यांना हाक देत तोही विहीरीत उतरला. मात्र मदत मिळण्यापूर्वीच तो सूद्धा विहीरीच्या पाण्यात बुडाला. दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायूमूळे गूदमरून झाला असावा, असा अंदाज आहे. विहिरीची रुंदी जास्त नव्हती त्यामुळे मध्ये वायू तयार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours