पुणे, 28 ऑगस्ट : प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला मंगळवारी (27 ऑगस्ट) रात्री अपघात झाला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सासवडजवळील हिवरे गावात त्यांच्या गाडीला अपघात झाला. यावेळेस त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे देखील होते. या अपघात सुदैवानं कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी घटनास्थळावर तातडीनं धाव घेतली. 'तरडे  परदेशी आणि चांदणे हे सुखरुप आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', असं आवाहन त्यांच्या चाहत्यांना करण्यात आलं आहे.
दरम्यान, मंगळवारी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचाही भीषण अपघात झाला होता. अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. पण त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं. मुंबईहून सांगोल्याच्या दिशेनं जात असताना इंदापूरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील वरकुटे येथील ही घटना घडली.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours